मुंबई – अभिनेता हृतिक रोशनचा आगामी प्रोजेक्ट ‘क्रिश 4’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात आला आहे की, नितेश तिवारीच्या ‘रामायण’पासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर हृतिकने ‘क्रिश 4’ कडे पूर्ण लक्ष वळवले आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, हृतिकने त्याचे वडील राकेश रोशनसोबत गेल्या महिन्यातच चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली आहे. यासाठी हृतिक रोशन आणि राकेश रोशनही हॉलिवूड दिग्दर्शकाच्या शोधात आहेत.
राकेश रोशन यांनी या गोष्टींवर मौन सोडले आहे. राकेश रोशन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की,”या गोष्टींमध्ये तथ्य नाही.” रोशन कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने या चित्रपटाबाबत अपडेट दिले आहे. सूत्रानुसार, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, त्याने अजून ‘क्रिश 4’ ची स्क्रिप्ट तयार केलेली नाही.
खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आता ‘रामायण’ सोडल्यानंतर त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपले सर्व लक्ष आगामी ‘क्रिश 4′ चित्रपटाकडे केंद्रित केले आहे.’ हृतिकच्या ‘क्रिश’ फ्रँचायझीचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. हृतिकच्या कमबॅकमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. आतापर्यंत या सर्व चित्रपटांचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन शेवटचा ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता.