“बाहुबली’ फेम सुपरस्टार प्रभास सध्या आगामी “आदिपुरुष’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा प्रभास एका नवीन अवतारात झळकणार असून त्यासाठी चाहते खूपच उत्साहित आहे. या चित्रपटाशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी ते एक्साइटेड असल्याचे दिसतेय.
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. यात प्रभाससोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा, कियारा आडवाणी या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या चित्रपटात अनुष्का किंवा कियारा नव्हे, तर क्रिती सेनॉन मुख्य भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, सैफ अली खान हा लवकरच मोठ्या पडद्यावर “बाहुबली’ फेम प्रभास याला टक्कर देणार आहे. हे दोघेजण “आदिपुरुष’मध्ये एकत्रित झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास हा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे, तर दुसरीकडे सैफ अली खान हा एका खुंखार खलनायकच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर करिना खान-कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.