बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता कार्तिक आर्यन सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की हे जोडपे कॅमेऱ्याच्या नजरेतून वाचत एकमेकांना डेट करत आहेत. आता क्रिती सेननने तिच्या डेटच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
कार्तिक आणि क्रिती हे दोन्ही स्टार्सही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. एवढेच नाही तर दोघेही एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना वाव मिळाला. त्याचवेळी क्रिती सेननने एका मुलाखतीत या अफवांवर मौन सोडले आहे. क्रिती म्हणाली की,’लोकांना नेहमीच आपल्या चाहत्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते.
View this post on Instagram
कृती पुढे म्हणाली की, ‘ लोकांनी काहीही बोलण्यापूर्वी सत्य जाणून घेतले पाहिजे. मला माहित नाही की सोशल मीडिया ही चांगली गोष्ट आहे की वाईट आहे, कारण त्यावर लोक त्यावर संमिश्र चर्चा करतात, आणि या चर्चांमुळे अशा अफवा महत्व येते. मात्र मला याचा त्रास होत नाही.’ असं क्रिती डेटिंगच्या चर्चांवर आपलं पूर्ण विराम लावला.