बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याला बॉलिवूडमध्ये ते स्थान मिळाले आहे, जे प्रत्येकाला जमत नाही. पण या प्रसिद्धीमागेही असे सत्य दडले आहे, जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. करोडो हृदयांवर राज्य करणारा शाहरुख खान अशी जीवनशैली जगतो, ज्याबद्दल जाणून तुम्ही दाताखाली बोट दाबाल.
शाहरुख खानला स्मोकिंगचे व्यसन आहे. आणि त्याने हे उघडपणे जाहीर केले आहे. 2011 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने स्वत: त्याच्या व्यसनाच्या सवयी बाबत सांगितल आहे. त्यांनी या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहे.
तो दिवसाला 100 सिगारेट ओढतो आणि सुमारे 30 कप ब्लॅक कॉफी पितातो. असं मुलाखतीत शाहरुखने त्याच्या खाण्यापिण्याच्या प्रेमाविषयीही सांगितले. त्याने सांगितले की त्याच्या वडिलांचे दिल्लीत रेस्टॉरंट होते आणि पठाणी जेवण हे त्या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य होते तर आई हैदराबादी जेवण बनवत असे. त्याने असेही सांगितले की जोपर्यंत त्याची आई जिवंत होती तोपर्यंत ती त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची.
याच मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या आहाराबद्दल खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की,’मला झोप येत नाही. मी सुमारे 100 सिगारेट ओढत होतो. त्यावेळी मी जेवायला विसरत असे. मला अनेकदा शूटिंगच्या मधल्या काळात आठवत असे की मलाही जेवायला हवं. मी पाणी पीत नाही. मी एकंदर तीस कप ब्लॅक कॉफी पितो आणि माझ्याकडे सिक्स पॅक ऍब्स आहेत. त्यामुळे मी स्वत:ची जितकी कमी काळजी घेतो तितकीच माझी आपोआप काळजी घेतली जाते.
शाहरुख वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख शेवटचा ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत होता या चित्रपटानंतर शाहरुखने दीर्घ ब्रेक घेतला. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.