मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. नुकताच तिला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर क्रितीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
आता तिची धाकटी बहीण नुपूर सेनन लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. नुपूर डेब्यू चित्रपटाचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. पण हा सिनेमा हिंदीचा नसून साऊथचा आहे. तिने साऊथमध्ये पदार्पण केले असून पहिल्याच चित्रपटात ती रवी तेजासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
क्रिती सेनॉनची बहीण नुपूर बॉलीवूड नव्हे तर साऊथ चित्रपटांकडे वळली आहे. पदार्पणासाठीही ती सज्ज आहे. नुपूरच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या तिच्या पहिला चित्रपट ‘टायगर नागेश्वर राव’ आहे. क्रितीने या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. तिच्या बहिणीच्या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करण्याबरोबरच तिने लिहिले की, ‘माझ्या बहिणीच्या पहिल्या संपूर्ण भारतातील टायगर नागेश्वर राव चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट काहीही असू शकत नाही.’
दरम्यान, या चित्रपटात रवी तेजा आणि नुपूर सेनन मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याशिवाय गायत्री भारद्वाज आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘टायगर नागेश्वरा राव’ बद्दल बोलले जात आहे की हा चित्रपट रवी तेजाच्या करिअरमधील सर्वात मोठा बजेट चित्रपट आहे.