मुंबई – अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ ही बॉलीवूडमधील चमकणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. जिने कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. क्रिती केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या फॅशन सेन्सनेही सर्वांना प्रभावित करते आहे. क्रिती सेनन सध्या तिच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
हा बहुचर्चित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होताच ‘आदिपुरुष’ला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. इतकेच नाही तर सोमवारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे सिद्ध करत आहे की, क्रिती सेनॉनचा हा चित्रपटही फ्लॉपच्या दिशेने जात आहे.
अशा परिस्थितीत आता हा चौथा फ्लॉप चित्रपट अभिनेत्रीच्या खात्यात आला आहे. गेल्या 18 महिन्यांपासून क्रिती सेनन एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट देत असल्याचं दिसून येत आहे.
तिच्या आधीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, आदिपुरुषापूर्वी ती कार्तिक आर्यनसोबत ‘शहजादा’ चित्रपटात दिसली होती. त्यांचा हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. गेल्या वर्षी क्रिती सेनन ‘भेडिया’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.
भेडियाच्या आधी क्रिती सेनन अक्षय कुमार आणि अर्शद वारसीसोबत ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसली होती. त्यांचा हा चित्रपट देखील सुपर फ्लॉप ठरला होता. सध्या क्रिती अनेक सुपर फ्लॉप चित्रपट देताना दिसून येत आहे.
मात्र, क्रिती सेननच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलत असताना, ती टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती शाहिद कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. इतकंच नाही तर क्रिती सेनन ‘द क्रू’ या चित्रपटातही काम करत आहे.