मुंबई – प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रीबुकिंगमुळे या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती, मात्र दुसऱ्या दिवसापासून कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे चित्रपटातील संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर गदारोळ सुरु आहे. प्रेक्षक या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, अनेक बड्या स्टार्सनी ‘आदिपुरुष’ बाबत आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत, अशात महाभारतात युधिष्ठिरची भूमिका करणाऱ्या गजेंद्र चौहाननेही या चित्रपटाला विरोध केला आहे.
गजेंद्र चौहान सांगतात की त्यांनी चित्रपटाचे तिकीट काढले होते, पण चित्रपट पाहायला गेले नाही. “मी चित्रपटाचे तिकीट घेतले होते, पण माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने मला तो सिनेमा हॉलमध्ये पाहण्यास सांगितले नाही. ट्रेलर आणि व्हायरल होत असलेली क्लिप पाहिल्यानंतरच हा चित्रपट पाहण्यासारखा नाही हे माझ्या लक्षात आले असल्याचे चौहान यांनी एका इंग्रजी माध्यमसमुहाशी बोलताना स्पष्ट केले.
गजेंद्र इथेच थांबला नाही, त्यांनी टी-सीरिजला सल्ला दिला. ते म्हणाले, ‘माझा विश्वास आहे की या सगळ्यामागे एक षडयंत्र आहे. या लोकांना येणाऱ्या पिढ्या बर्बाद करायच्या आहेत. मी टी-सिरीजचे भूषण कुमार यांना सांगू इच्छितो की, त्यांनी वडिलांप्रमाणेच प्रामाणिकपणे काम करावे. येणाऱ्या काळात या गोष्टींचा प्रचार करू नये.
चित्रपटाच्या संवादांबद्दल बोलताना गजेंद्र म्हणाले, ‘तीर कमान से निकल गया है. अशा परिस्थितीत जे नुकसान व्हायचे होते ते झाले आहे. आता कितीही सुधारणा करा, पण त्यात सुधारणा होणार नाही. चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा लोकांनी आधीच दिली आहे. पहिल्या दिवसाची कमाई आणि त्यानंतरच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे. हे लोक शिक्षेस पात्र आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट कसा पास केला याचे मला आश्चर्य वाटते. चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. त्यावर कारवाई करून सरकारने तातडीने बंदी घालावी.