खडकवासला – ‘आज तुला संपवतोच…’, असं म्हणतं पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करत तिला गंभीर जखमी केल्याची घटना धायरी परिसरात घडली. याप्रकरणी पती आनंद मसाजी वाघमारे याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करुणा आनंद वाघमारे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
पत्नीने, नेकलेस दागिन्यासाठी ४ महिन्यांपूर्वी २५ हजार रुपयांचे बुकींग केलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता आनंद याने चिडून वाद घातला व हल्ला केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. वादानंतर करुणा त्यांच्या मुलासह त्यांचे वडील महादेव सुरवसे यांच्याकडे निघाल्या असताना आनंद याने चिडून शिवीगाळ केली. उजवा हात पिरगाळून करंगळी शेजारील बोट दुमडले.
करुणा यांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या हाताला चावा घेतला. आनंद याने बेडखालुन कोयता काढून “तुला आज संपवतोय, असे म्हणत करुणा यांच्या डोक्यात, उजव्या भुवईच्या वर तसेच उजव्या कानाच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
कुटुंबातील कोणतेही नाते आसो सामोपचाराने समन्वय ठेऊन मिटवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. निर्घृणपणे विचार करून आपल्याला व पुर्ण कुटुंबातील व्यक्तीला ञास होईल असे वागूच नये .
– जयवंत राजूरकर ,पोलीस निरिक्षक