पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेला पुरविण्यात आलेला कोव्हिशिल्ड लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 5) फक्त कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले जाणार आहेत.
शहरातील 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस आठ केंद्रावर देण्यात येणार आहे. यासाठी शंभर टक्के ऑनलाइन नोंद केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येणार आहे. तर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस आठ केंद्रावर देण्यात येणार आहे. त्यासाठी सकाळी आठ वाजता लसीकरण केंद्रावर टोकन वाटप केले जाईल. तसेच केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट नोंदणी करून लस देण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.