KKR vs SRH : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी मैदानावर आमंत्रित केलं. केकेआरच्या डावाची सुरुवात खराब झाली. नरेन,अय्यर आणि श्रेयस झटपट बाद झाल्यानंतर नितीश राणा देखील केवळ नऊ रण बनवून तंबूत परतला.
यानंतर फिलिप सॉल्टने संयमी खेळी करत दमदार फिफ्टी पूर्ण केली आणि केकेआरचा डाव सावरला. मात्र फिफ्टी पूर्ण करताच तो तंबूत परतला आणि केकेआरला सहावा धक्का बसला.मारकंडेला सॉल्टची वादळी खेळी रोखण्यात यश आलं. 15 ओव्हर्सनंतर केकेआरने 6 विकेट्स गमावून बोर्डावर 123 धावा लावल्या होत्या. | KKR vs SRH
That Catch 👏
Mayank Markande holds on well to dismiss the explosive Ramandeep Singh
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱
Match updates ▶️ https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/T8meaNfFQ8
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
अशी आहे प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगक्रिश रघुवंशी आणि रहमानउल्ला गुरबाज. | KKR vs SRH
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन. प्रभाव उप: नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स आणि अभिषेक शर्मा.