मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्यान कोणत्या कारणावरुन सुहाना ट्रेंडिगमध्ये असते. सुहाना तशी सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली असते. मात्र यावेळी ती फोटोशूट नव्हे तर तिला रंग रंगभेदावरून ट्रोल्स करणाऱ्याला दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आली आहे. तिने पोस्ट शेअर करत रंगभेदसंपवण्याचे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टमधून तिने हा सर्व प्रकार थांबवला जावा याबाबत आवाहन केले आहे.
तिने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘सध्या खूप काही सुरु आहे आणि हा इश्यू लवकरच आपल्याला ठीक करायला हवा. हे केवळ माझ्याविषयी नाही आहे, तर ज्या तरुण मुलामुलींनी त्यांचे आयुष्य दडपणाखाली घालवले त्यांच्याविषयी आहे. या माझ्याविषयी करण्यात आलेल्या काही कमेंट्स आहेत. मी 12 वर्षांची असल्यापासून माझ्या रंगामुळे मला कुरुप बोलण्यात आले, तेही प्रौढ स्त्री आणि पुरुषांकडून.’
तिने तिच्या या पोस्टमध्ये #endcolourism असा हॅशटॅग वापरून असे म्हटले आहे की, ‘या सर्व प्रौढ व्यक्ती आहेत याशिवाय वाईट हे आहे की ते सर्व भारतीय आहेत, म्हणजेच आम्ही सर्व ‘Brown’ आहोत- हो आमच्यामध्ये वेगवेगळ्या छटा आहेत पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही या Melanin पासून तुम्ही स्वत:ला वेगळे करू शकत नाही. स्वत:च्या माणसांचा द्वेष करणे याचा अर्थ एवढाच होतो की तुम्ही किती वेदनादायकरित्या असुरक्षित आहात’
दरम्यान , सुहाना लवकरच सिनेमांमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे आणि आपल्या पहिल्या प्रोजेक्टपासून सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून फॅन्ससोबत नातं बनवू इच्छित असेल.