प्योंगयांग – उत्तर कोरियाचा सनकी हुकुमशहा किम जोंग उन याचे नवनवे किस्से रोज समोर येत असतात. आपल्याला न रूचणाऱ्या गोष्टी करणाऱ्यांना सर्रास मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात हा हुकुमशहा कचरत नाही. बरे मृत्यूदंडही अशा प्रकारे दिला जातो की मृत्यूलाही त्याचे भय वाटावे. आता याच किम जोंग उन यांचा कठोर शिक्षेचा आणखी एक नमूना समोर आला आहे.
गेल्या काही काळात त्या देशात पॉर्न फिल्मसच्या विरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. हा प्रकार करणाऱ्यांना म्हणजे हे चित्रपट पाहणाऱ्यांना इतरांना धडा मिळेल अशी शिक्षा दिली जावी असे आदेश किम जोंग उन यांनी दिले आहेत.
त्याचा फटका एका कुटुंबाला बसला आहे. या कुटुंबातील आई- वडिला बाहेर गेले असताना संबंधित मुलाने एक पॉर्न साइट सर्च केल्याचे निदर्शनास आल्यावर त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देशातून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे, तर तो मुलगा ज्या शाळेत शिकतो त्या शाळेच्या मुख्याध्यापकालाही लेबर कॅम्पमध्ये पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा कॅम्पमध्ये 5 ते 15 वर्षे या कालावधीसाठी सक्तमजुरी करावी लागते.