सेऊल – उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन हे विचित्र नियम लागू करण्यासाठी सतत चर्चेत असतात. उत्तर कोरियाच्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीदरम्यान एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये किम जोंग-उन खूपच बारीक दिसत होते. तसेच फोटोत त्याच्या चेहऱ्यावर बदल स्पष्ट दिसत होता. फोटोमध्ये किम जोंग-उनचे वजन कमी झाल्याचं दिसत आहे. रिपोर्टनुसार, त्याचे वजन किमान 20 किलो म्हणजेच 44 पौंडांनी कमी झाले आहे.
किम जोंग-उनचे वजन कमी झाल्यामुळे अलीकडेच त्याच्या तब्येतीबद्दल जगभरात चर्चा सुरू होती. याबाबत अधिकाऱ्यांनीही दावा केला आहे की, किम पूर्णपणे निरोगी आहे. त्याचबरोबर पक्षाच्या बैठकीत किम जोंग उन दिसल्यानंतर त्याच्याबाबतच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
उत्तर कोरियामध्ये अन्नाच्या कमतरतेमुळे किम जोंगउनने जेवण कमी केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग-उनने आपल्या नागरिकांनाही परिस्थिती सामान्य होईपर्यंत कमी अन्न खाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अलीकडेच, त्यांनी आपले वडील आणि देशाचे माजी शासक किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त देशातील लोकांना 11 दिवस हसणे, मद्यपान, पार्टी आणि खरेदी करण्यावर बंदी घातली होती.