खेड-शिवापूर -राजगड पोलिसांनी गुरुवारी (दि. 18) खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याप्रकरणी जुगार चालकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी जुगारअड्डा चालक पापामिया हुसेन शेख, रवी कुमार कुरमया, खंडू अरुण खांबे, संतोष हिरालाल धुमाळ, सोमनाथ बाळासाहेब जाधव, प्रमोद रघुनाथ जाधव, समीर अन्वर शेख, भुजंग रंगनाथ कांबळे, रोहित अशोक पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली.
खेड-शिवापूर येथील कोंढणपूर फाट्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी गुरुवारी (दि. 18) सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी अनेक जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी याप्रकरणी जुगार अड्डाचालकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तसेच सुमारे 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.