अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूूल येथे 12 ते 14 वयोगटातील (इयत्ता 6वी ते 8वी) च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आज बुधवारी (दि. 23) रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रशालेत सकाळी 10 ते 12 या वेळेत पालकांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक एन. डी. वाघमोडे यांनी केले आहे.
लसीकरणासाठी शाळेत येताना विद्यार्थ्यांनी आपापले आधार कार्ड घेवून उपस्थित राहावे.
- हे नियम पाळा-
– जे विद्यार्थी आजारी आहेत किंवा औषधे सुरू आहेत त्यांनी लस घेवू नये.
– लस घेण्यासाठी पालकांची परवानगी घ्यावी.
– लसीकरणादरम्यान पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे
– लस घेण्यासाठी येताना पोटभर जेवण करुन यावे.
– फक्त इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गातील (12 ते 14 वयोगटातील) विद्यार्थ्यांनाच लस मिळणार आहे.