गुजरात – सध्या गुजरातच्या कच्छ खदीर बेटावर असलेल्या भांजदादाच्या मंदिरात मोरारीबापूंची रामकथा सुरू, असून मोठ्या संख्येने भाविक या याठिकाणी गर्दी करत आहे. यावेळी एक ८६ वर्षीय वृद्ध महिला देखील ही कथा ऐकण्यासाठी डोंगरावर चढत होती. यादरम्यान तिला उष्णता सहन न झाल्याने ती जागीच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली.
ही बाब महिला कॉन्स्टेबल वर्षाबेन परमार यांना समजताच त्यांनी तातडीने वृद्ध महिलेसाठी मदतीचा हात पुढे करत, त्या महिलेला खांद्यावर उचलले आणि कडक उन्हात तब्बल ५ किमी चालत वृद्ध महिलेला तिच्या घरी सुखरूप नेले. या घटनेतून एका महिला पोलीस अधिकाऱ्याने माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
“खाखी की मानवता”
कच्छ के रापर में मोरारीबापू जी की कथा सुनने हेतु पैदल चलते जा रहे 86 वर्षीय बुजुर्ग को स्वास्थ्य परेशानी होने के कारणवश, एक महिला पुलिस अधिकारी वर्षाबेन परमार जी ने उन्हे 5 कि.मी तक अपने कंधों पर बिठाकर गंतव्य स्थान तक पहुंचाकर सेवा का उत्कृष्ट उदाहरण पेश किया। pic.twitter.com/FZxTLWVbGD
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) April 22, 2022
सध्या सर्वच स्तरातून कॉन्स्टेबल वर्षाबेन परमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, गुजरातच्या गृहमंत्रालयाकडूनही त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी महिला पोलिसाचे कौतुक करत “खाकीची मानवता’ असे ट्विट केले आहे.
“कच्छमधील रापर येथे मोरारीबापूजींची कथा ऐकण्यासाठी पायी जात असलेल्या ८६ वर्षीय वृद्ध महिलेला तब्येतीच्या त्रासामुळे महिला पोलीस अधिकारी वर्षाबेन परमार यांनी खांद्यावर उचलून ५ किमीपर्यंत नेले. त्यांनी सेवेचा उत्कृष्ट नमुना ठेवला आहे.’ या आशयाचे ट्विट गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी केलं आहे.