खडकवासला धरणातून विसर्ग सुरूच; भिडे पूल पाण्याखाली जाणार

पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून सकाळी 10 पासून सुमारे 13 हजार 981 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. या पाण्यामुळे डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली जाणार असून महापालिका आणि पोलिसांकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 10 हजार क्यूसेक पेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्यानंतर या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रशासनाकडून 12 वाजता नदीपत्रातील रस्ता बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 32, पनशेत 147, वरसगाव 133 तर टेमघर धरणात 142 मिमी पाऊस झाला असून पानशेत धरण 83 टक्के भरले आहे. तर या पावसाने हे धरणही भरण्याची शक्यता लक्षात घेऊन खडकवासला धरण रिकामे केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.