पुण्यातील रस्ते प्रकल्पात चिनींचा शिरकाव

पुणे – चिनी माल, चिनी वस्तूंनी बाजारपेठ काबीज केली असताना आता भारतातील प्रकल्पांमध्ये चिनी उद्योजकांनी शिरकाव करण्याला सुरुवात केली आहे. पुण्यातील “एचसीएमटीआर’ प्रकल्पदेखील चिनी कंपनीच करणार असून, त्यांनी सर्वात कमी किंमतीची निविदा टाकली आहे.

पुण्यातील उच्चतम क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) हा 36 किमी रस्ता होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. पहिल्यांदा एकाच कंपनीची निविदा आल्यामुळे प्रशासनाने मुदतवाढ दिली. आता दोन कंपन्यांच्या निविदा प्रशासनाला मिळाल्या आहेत. दोन्ही कंपन्यांमधी चिनी कंपन्यांची भागीदार आहे. यापैकी एका कंपनीला काम मिळेल. सध्या दोन्ही निविदांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.

एकूण 5 हजार 912 कोटींचा हा प्रकल्प आहे. यासाठी “लोंगेयन कन्स्ट्रक्‍शन कंपनी’ने “गावर कन्स्ट्रक्‍शन कंपनी’शी भागीदारी केली आहे. तर दुसऱ्या एका कंपनीने अदानी ग्रुप यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. दोन चीनच्या कंपन्यांनी भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी करून निविदा भरल्या आहेत. प्रशासनाने सध्या “अ’ पाकीट उघडले आहे. याची तांत्रिक तपासणी झाल्यानंतर “ब’ पाकिट उघडण्यात येईल. यामध्ये संबंधित कंपन्यांनी निविदा किती भरली आहे हे माहित होईल. ज्या कंपनीची निविदा कमी असेल आणि तांत्रिक दृष्या योग्य असेल अशा कंपनीला काम मिळेल, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.