नवी दिल्ली – देशात करोना विषाणूमुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. केरळनंतर आता आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना जेएन.1 च्या नवीन प्रकाराची पुष्टी झाली आहे. त्यामुळे 9 दिवसांमध्ये देशातील करोना रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. केरळनंतर महाराष्ट्र आणि गोव्यात करोनाच्या नविन विषाणूचे 19 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात 1 रूग्ण आढळला आहे.
देशात करोना रुग्णांची संख्या 2 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. 11 डिसेंबरलो कोरोनाचे 938 रूग्ण होते. वाढत्या करोना रूग्णाच्या संख्येबाबत केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया बैठक घेतली.
करोनाच्या नवीन विषाणून जेएन.1 सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये कहर करत आहे. मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत. रूग्णालयातील बेड देखील उपलब्ध नाहीत. सिंगापूरमध्ये नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
डब्ल्यूएचओने या नवीन प्रकाराचे वर्गीकरण केले आहे. आणि त्याला व्हेरिएंट ऑफि इंटरेस्ट या श्रेणीमध्ये ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, जेएन.1 या करोनाच्या विषाणू वेगाने पसरत आहे. परंतु मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, सावधगीरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.