“वयाच्या १५ व्या वर्षीच माझ्यावर ८ जणांनी केला बलात्कार”..सुनिता यांची कथा ऐकून अमिताभ झाले स्तब्ध..

मुंबई – अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्यात एक ‘कर्मवीर स्पेशल’ भाग असतो. या भागामध्ये समाजामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना बोलावण्यात येते. आज होणाऱ्या या कर्मवीरच्या भागात समाजसेविका ‘सुनिता कृष्णन’ यांना बोलावण्यात आले आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसत आहे.

सुनिता यांनी अनेक महिलांना तसेच त्यांच्या मुलींना मानवी तस्करीपासून मुक्त करण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये सुनिता यांनी त्यांच्या संघर्षाची कथा कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ यांच्यासमोर मांडल्याचे पहायला मिळत आहे. त्या म्हणाल्या की त्या 15 वर्षांच्या असताना त्यांच्यावर 8 जणांनी बलात्कार केला होता. हे ऐकल्यानंतर अमिताभ यांच्यासोबतच कार्यक्रमात सहभागी झालेले प्रेक्षक स्तब्ध झाले आहेत.

सुनिता यांची कथा ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन सुन्न झाले. यावर काय बोलायचे हेच त्यांना काही क्षण सुचत नव्हते. सुनिता काही वर्षांपासून एक एनजीओ चालवत आहेत. त्यांनी आतापर्यंत 22 हजारांहून अधिक मुलींची तस्करीतून मुक्तता केली आहे. त्यांच्या या कामासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

त्या पुढे म्हणतात की जेव्हा त्या अशा मानवी तस्करी झालेल्या मुलींची सुटका करायला जातात तेव्हा त्यांचा नेहमी अपमान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत 17 वेळा जीवघेणे हल्ले झाले आहेत. मात्र, या हल्ल्यांना मी घाबरत नाही असे त्या सांगतात.माझा श्वास सुरू असेपर्यंत मी या मुलींसाठी काम करणार असे देखील त्या या प्रोमात बोलताना दिसत आ

Leave A Reply

Your email address will not be published.