मुंबई – अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या 40 व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी पती विकी कौशलसोबत मुंबईतून बाहेर गेली आहे. हे कपलला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. कतरिना कैफने फ्लोरल टॉप आणि डेनिम जीन्स घातली होती, तर विकी कौशल ट्रॅक सूटमध्ये दिसला होता. विकी कौशलच्या एअरपोर्ट लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कतरिना कैफ आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कतरिना कैफच्या आवडत्या ठिकाणांमध्ये मालदीवचा समावेश नेहमीच केला जात असला तरी, ती मालदीवला जाणार आहे की यावेळी तिने तिच्या बकेट लिस्टमधून आणखी काही ठिकाण निवडले आहे हे स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या या व्हेकेशनवर एका यूजरने लिहिले की, “मला माहित आहे की ते दोघे मालदीवला जात आहेत कारण ते दोघेही फ्लाइटमध्ये माझ्यासमोर बसले आहेत.” असे अनेक मजेशीर कमेंट्स आता चाहत्यांकडून लिहिले जात आहे. फॉलोअर्सला कपलच्या व्हेकेशनच्या फोटोंची वाट पाहावी लागणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लव्हस्टोरीबद्दल चाहत्यांना अजूनही फार माहित आहेत. कारण दोघांची प्रेमकहाणी आणि लग्न हे चाहत्यांसाठी सरप्राईज होते, बऱ्याच गोष्टी हळुहळू अजून उघड व्हायची आहेत.