जयपूर – सिने अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा आज शाही समारंभात विवाह सोहळा पार पडला. राजस्थानातील सिक्स सेन्सेस फोर्ट या आलिशान हॉटेलमध्ये या जोडीने हिंदू रितीरिवाजांप्रमाणे विवाह केला.
हा विवाह सोहळा जितका शाही होता, तितकाच तो खाजगीही होता. दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक या विवाह सोहळ्यासाठी निमंत्रित होते. याशिवाय बॉलिवूडमधील फारच थोड्या सेलिब्रिटींना या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले होते. दबंग सलमान खानच्या कुटुंबीयांनाही या समारंभाचे निमंत्रण देण्यात आलेले नव्हते.
विवाह सोहळ्याला प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश दिला गेला नव्हता. मात्र या सोहळ्याचे काही फोटो प्रसार माध्यमांपर्यंत उपलब्ध केले गेले होते. दुपारी 3.30 वाजता वधूवरांनी सप्तपदी पूर्ण केल्यावर विवाह सोहळा पार पडल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.