मुंबई – बॉलीवूडमधील भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान हा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक सुपरहिट हिरो मानला जातो. त्याचे प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करतात. आता लवकरच सलमान खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘टायगर-3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सलमान – कतरिना कैफचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘भारत’ नंतर सलमान-कतरिनाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सोशलवर या चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यापासून चाहत्यांमध्ये याची जबरदस्त चर्चा आहे.चित्रपटाचं शेवटचं शेड्यूल दिल्लीत शूट होणार असून त्यासाठी सलमान-कतरिना दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत.
व्हायरल व्हिडियोमध्ये कतरिना ब्लॅक लेदर पॅन्ट आणि व्हाइट स्वेटशर्टमध्ये दिसली. त्यात तिने पांढरे शूज घातले होते. तर सलमान काळ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि मस्त जॅकेट घातलेला दिसत होता. दरम्यान,चित्रपटासाठ सलमान खान-कतरिना कैफ देशाच्या राजधानीत सुमारे 10-12 दिवस चित्रपटाचं शूटिंग करणार आहेत.