पुणे – महाविकास आघाडीचे कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासारख्या उमेदवारास नागरिकांनी निवडून देण्याची गरज आहे. कसब्याचा चेहरा-मोहरा ते बदलू शकतील, असा विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही धंगेकर यांना पाठिंबा देत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलच्या मेळाव्यात ठरवण्यात आले.
या मेळाव्यात 100 पेक्षा अधिक डॉक्टर्स उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. शशिकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी आपल्या भाषणात सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे पाठिंबा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी उमेदवार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्व डॉक्टरांची भेट घेतली. या मेळाव्यात डॉ. परशुराम सूर्यवंशी, डॉ. सुनील होनराव, डॉ. शशिकांत कदम, डॉ. सुनील जगताप, डॉ. हेमंत तुसे, डॉ. राजेश साठे, यांची भाषणे झाली. डॉ. नितीन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.