मुंबई – बॉलीवूडचा चॉकलेट अभिनेता ‘कार्तिक आर्यन’ आपल्या चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही, त्यामुळेच त्याची फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. आता कार्तिक होळी उत्सवात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत पोहोचला आहे. जिथे चाहत्यांच्या जमावाने त्याला घेरले आणि कार्तिकच्या नावाचा जयघोष सुरू केला. कार्तिकने अमेरिकेत होळी साजरी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे.
कार्तिक आर्यनने अमेरिकेतील डलास येथे होळीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. कार्तिकला पाहताच त्याच्या चाहत्यांची गर्दी उसळल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गर्दी पाहून कार्तिक आर्यनही त्याच्या गाडीवर चढला. रंग आणि गुलालात होळी साजरी करताना कार्तिकने त्याच्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाची हुक स्टेपही केली.
View this post on Instagram
दरम्यान, कार्तिकने अमेरिकेत होळी साजरी करतानाचा व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता म्हणतो की, ‘परदेशातील भावना.. मी पहिल्यांदाच अमेरिकेत आलो आणि इतकं अफाट प्रेम पाहून विश्वास बसेना. इतक्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. ही होळी नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील…’ असं तो म्हणाला आहे. कमेंट सेक्शनमध्येही चाहते कार्तिकवर खूप प्रेम करत आहेत. सध्या त्याचे अमेरिकेतील होळीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.