लंडन – करोना महामारीचा मोठ्या प्रमाणावर फटका वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही बसला अनेक डॉक्टर्स आणि नर्सही या महामारीचे शिकार बनले लंडनमधील एक नर्स अशीच करोना मुळे आजारी पडली आणि प्रकृती बिघडल्याने ती तब्बल 29 दिवस कोमात होती पण तिच्यावर व्हायग्रा या वेगळ्या गोळीचा उपचार केल्यानंतर ती कोमातून बाहेर आल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे.
लँडनजवळ एका उपनगरात राहणारी मोनिका अल्बो या महिला परिचारिकेने बाबत ही घटना घडली आहे 31 ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आल्यानंतर मोनिकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तिच्या आजाराचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते उपचारासाठी दाखल झाल्यानंतर आठवड्याभरातच तिला अति दक्षता विभागात हलवण्यात आले त्याच ठिकाणी ती कोमामध्ये गेली.
तिला वेंटीलेटरही लावण्यात आले होते 72 तासांनी व्हेंटिलेटर बंद करण्यात येऊन तिच्या आयुष्याला पूर्णविराम देण्यात येणार होता पण त्याच वेळी डॉक्टरांनी तिच्यावर व्हायग्राचे उपचार करण्याबाबत निर्णय घेतला पुरुषांमधील लैंगिक समस्येवर उपाय म्हणून वापरण्यात येणार्या वायग्रा या गोळीमुळे शरीरातील रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो मोनिकाला व्हायग्राच्या गोळ्या दिल्यानंतर आठवड्याभरातच तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली रक्तप्रवाहात सुधारणा झाली.
आणि ऑक्सिजनची पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली 14 डिसेंबर रोजी मोनिका शुद्धीवर आली आणि कोमातूनही बाहेर आली तिच्या प्रकृतीत आता मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहेआपल्यावर व्हायग्राच्या गोळ्याचा उपचार करण्यात आल्याचे मोनिकाच्या लक्षात आल्यावर तिला ती खूप गंमत वाटली अनेक इतरही अनेक जणांना करोनापेशंटवर अशाप्रकारे या गोळ्यांचा वापर करणे की मजेची आणि गमतीची गोष्ट वाटली पण डॉक्टरनी मोनिका वर केलेला व्हायग्राचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.