सातारा, (प्रतिनिधी) – कराडमधील दोन जणांचे करोना रिपोर्ट सोमवारी सकाळी पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७९ झाली आहे. १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील म्हणून दाखल करण्यात आलेल्या २ जणांचा अहवाल करोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ७९ झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ (कोविड १९) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ५, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ५, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील १५२, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील ९ असशा एकूण १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले असल्याची माहिती अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.