न्युयॉर्क :- अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत बेलारुसच्या आर्यना सबालेन्काने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या क्विनवेन झेंगवर 6-1, 6-4 अशी मात केली आणि थाटात उपांत्य फेरी गाठली.
अन्य लढतीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुश्कोव्हाने रुमानियाच्या सोरेना क्रिस्टाचा 6-0, 6-3 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुसरीकडे अमेरिकेच्या मेडीसन की हीने चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा सिमकोव्हाचा 6-1, 6-4 असा पराभव करत थाटात उपांत्य फेरी गाठली.
आता महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत मुश्कोव्हाचा सामना अमेरिकेच्या कोको गॉफशी होणार असून दुसऱ्या उपांत्य फेरीत आर्यना सबालेन्काची लढत मेडीसन की हीच्याशी होणार आहे.