आमीर खान त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करतो आहे. त्याला फॅन्सकडून ढिगभर शुभेच्छा मिळत आहेत. त्यातच करिना कपूरनेही त्याला आपल्या हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. आमीर खान झोपलेला आहे आणि त्याने एक उशी कवटाळली आहे. त्या झोपलेल्या आमीर खानबरोबर करिनाने गुपचूप एक सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर हा फोटो पोस्टही केला.
माझ्या फेव्हरेट ऍक्टरचा तक्या अशी कॅप्शनही तिने दिली आहे. तिच्या या पोस्टला पब्लिकने खूप कॉमेंट केल्या आहेत. आमीरलाही हा फोटो खूप आवडला. हा फोटो एखाद्या विमानात काढला गेला असावा, असे दिसते आहे. आमीर आणि करिनाने 3 इडिएट आणि तलाशमध्ये एकत्र काम केले होते.
आता हे दोघे लाल सिंग चढ्ढामध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात भारतात गेल्या 30 वर्षात घडलेल्या प्रमुख घटनांची झलकही बघायला मिळणार आहे. स्वतः आमीर खानच या सिनेमाची निर्मिती करतो आहे. या सिनेमातून आपल्या मुलाला जुनैदला बॉलीवूडमध्ये उतरवण्याचा विचार तो करत होता. पण सरतेशेवटी त्याने स्वतःच हा रोल करायचे ठरवले. या वर्षी ख्रिसमसच्या सुमारास लाल सिंग चढ्ढा प्रदर्शित होणार आहे.