मुंबई – डायरेक्टर करण जोहर अशा बॉलीवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांना सर्वाधिक ट्रोल केले जाते. करण जोहरवरही अनेक आरोप झाले आहेत. अलिकडेच, करण त्याच्या कॉफी विथ करण या चॅट शोवरून चर्चेत होता, या शोवरून त्याला लोकांचे ऐकावे लागले. त्याला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
या ट्रोलिंगला कंटाळून अखेर करणने त्याच्या अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली,’मी आणखी सकारात्मक उर्जेसाठी जागा निर्माण करत आहे, आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर..!’ करणने असं लिहीत ट्विटर सोडल्याचे सांगितले आहे.
करण जोहरवर अनेकदा नेपोटिझम आणि स्टार किड्सला प्रोत्साहन दिल्याचे आरोप झाले आहेत. ते काहीही पोस्ट करत असले तरी वापरकर्ते त्यांना ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत. अलीकडेच, कॉफी विथ करण चॅट शोमध्येही लोकांनी त्याला त्याच्या वागण्यावरून ट्रोल केले. प्रत्येक एपिसोडमध्ये आलियाचे प्रमोशन करणे, सारा आणि जान्हवी यांच्यात जान्हवीला सपोर्ट करणे यासाठी त्याला टोमणे मारण्यात आले. त्यामुळेच करणने ट्विटरला अलविदा केल्याचे मानले जात आहे.