मुंबई – अभिनेत्री उर्वशी रौतेला ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या दुनियेत ती खूप सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून उर्वशी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या कॅप्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत आहे.
View this post on Instagram
उर्वशी सतत असे फोटो शेअर करत असते, जे पाहून लोकांचे मन विचलित झाले आहे. चित्रांपेक्षा उर्वशीचे कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच तिने तिच्या प्रायव्हेट जेटमधील एक फोटो शेअर करून सांगितले की,’तिच्या प्रेमाचा पाठलाग करत ती ऑस्ट्रेलियाला पोहोचली आणि आता तिने सिंदूर घातलेला फोटो शेअर केला आहे.’
View this post on Instagram
उर्वशी रौतेलाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या भांगेत कुंकू दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले की,’हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला एक वाईट सवय आहे जी, आजकाल सर्वांच्या आवडीची नाही. मी जे बोलते ते पूर्ण करते.’ यासह तिने इमोजी देखील पोस्ट केला. हे कॅप्शन पाहताच तिने लग्नाचे पाऊल उचलले का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.