कपिल सिब्बल यांचा अमित शहांना सवाल; म्हणाले, तुम्ही कोणत्या गॅंगचे सदस्य होता?

नवी दिल्ली – जम्मू काश्‍मीरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवण्यासाठी पिपल्स अलायन्स ऑफ गुपकर डिक्‍लरेशन ही आघाडी उघडण्यात आली होती. या आघाडीत कॉंग्रेस सहगाभी होणार असल्याच्या वृत्तावरून अमित शहा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता.

त्यावेळी त्यांनी म्हटले होती की जम्मू काश्‍मीर मध्ये पुन्हा दहशतवाद्यांचे राज्य परत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गॅंग मध्ये कॉंग्रेस सहभागी होत आहे, त्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की या आधी भाजपने काश्‍मीरातील पीडीपी बरोबर सरकार स्थापन केले होते त्यावेळी अमित शहा हे कोणत्या गॅंगचे सदस्य होते हे त्यांनी स्पष्ट करावे.

पीडीपी आणि अन्य स्थानिक पक्षांची एक आघाडी काश्‍मीरात स्थापन करण्यात आली आहे. त्यात कॉंग्रेसने सहभागी होण्यावरून भाजपच्या अमित शहा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे तथापि याच भाजपने या आधी काश्‍मीरात पीडीपी बरोबर आघाडी करून सरकार स्थापन केले होते. त्यावेळी भाजपला पीडीपी हा पक्ष चालला.

पण आता पीडीपी पक्षाबरोबर कॉंग्रेस आघाडी करण्याचा प्रयत्न करीत असताना भाजपने त्यांच्यावर दहशतवाद्यांच्या टोळीत कॉंग्रेस सहभागी होत असल्याची ओरड चालवली आहे. त्या अनुषंगाने कपिल सिब्बल यांनी अमित शहांना हा सवाल विचारला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.