मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत होते. मात्र, अखेर काल सिद्धार्थ आणि कियारा यांचं लग्न जैसमेरमध्ये पार पडलं आहे. शेरशाह रिलीज झाल्यापासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराच्या जोडीबाबत त्यांचे फॅन्स खूपच एक्साईटेड होते. शेरशाह मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विजय बत्रा यांचा रोल केला होता. तर कियारा आडवाणी विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमा च्या रोलमध्ये दिसली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत असलेलं हे क्युट कपल लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्याही आयुष्यात 7 फेब्रुवारी 2023 हा दिवस खऱ्या अर्थानं संस्मरणीय आणि सुंदर दिवस ठरला आहे. राजस्थानमधील जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा दणक्यात आणि उत्साही वातावरणात पार पडला.
दरम्यान, सिद्धार्थ कियारा यांनी आता लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कियाराने फोटो शेअर करताना म्हटलं की, ‘आता आपलं पर्मनंट बूकिंग आहे’. त्याचवेळी बॉलिवूडची बोल्ड क्वीन कंगना राणावत हिने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमधून कंगनाने या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केल्याचं दिसून येत आहे.
Yes they were but not for brands or movie promotions, they never did any attension seeking Bolly relationship gimmicks to milk limelight ….. so much integrity and genuine love, delightful couple 🥰♥️♥️
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 8, 2023
कंगनाने लिहलं आहे, “हो ते होते, पण ब्रँड किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हते. लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी कधीही बॉलीवूडमधील नातेसंबंधांची नौटंकी केली नाही… एक दम खरे प्रेम, सुंदर जोडपे”. असं अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली आहे. सध्या बॉलिवूडच्या नवीन जोडप्याला सर्वच अजून आशीर्वाद देत आहेत.
या दोघांच्या विवाह सोहळ्याला त्यांचे कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि काही खास मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते. या सर्वांच्या साक्षीनं, शुभेच्छांसह कियारा मल्होत्रांच्या घरची सून झाली. 4-5 दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी लक्झरी व्हिला बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं.