अरेरे ..आजचा मुहूर्त हुकला ! ‘जिओ फोन नेक्स्ट’साठी दिवाळीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा !

प्रत्येक वेळी सरप्राईज देऊन ग्राहकांना चकित करणाऱ्या जिओने यावेळी मोठा धक्का दिला आहे. जिओचे लाखो ग्राहक जे आज म्हणजेच 10 सप्टेंबरला जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत होते, त्यांचे स्वप्न भंगले आहे. रिलायन्सने जिओ फोन नेक्स्टच्या विक्रीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. जिओ फोन नेक्स्टची विक्री आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबरपासून सुरू होणार होती, परंतु आता कंपनीने सांगितले की फोन सध्या ट्रायलमध्ये आहे. त्याची विक्री दिवाळीपूर्वी होईल. कंपनीने विक्रीच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

रिलायन्स जिओने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘जिओ फोन नेक्स्ट’ या वर्षी जूनमध्ये त्यांच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केला आहे. फोनची किंमत आणि वैशिष्ट्यांविषयी काही विशिष्ट माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागीदारीत जिओ फोन नेक्स्ट तयार करण्यात आला आहे. जिओ फोन नेक्स्टची किंमत 3,499 रुपये असेल. यापूर्वीच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की जिओ फोन नेक्स्टची किंमत 50 डॉलरपेक्षा कमी असेल.

अँड्रॉइड 11 ची गो एडिशन जिओ फोन नेक्स्टमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय फोनला 5.5 इंचाचा HD डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये क्वालकॉम क्यूएम 215 प्रोसेसर, 2 किंवा 3 जीबी रॅम आणि 16 किंवा 32 जीबी स्टोरेज मिळेल. ग्राफिक्स साठी Adreno 308 GPU उपलब्ध असेल. जिओ फोन नेक्स्टच्या कॅमेऱ्याने गुगल लेन्सला सपोर्ट मिळेल. याशिवाय अनेक प्रकारचे फिल्टर उपलब्ध असतील. कॅमेरासह पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध असेल.

स्नॅपचॅट फिल्टर देखील कॅमेरासह उपलब्ध असतील. जिओ फोन नेक्स्टवरील गुगल असिस्टंट तुमच्या सांगण्यावर संगीत वाजवेल आणि माय जिओ ऍपदेखील उघडेल. जिओ फोन नेक्स्टला सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट मिळतील. फोनमधील फिजिकल बटणे फक्त पॉवर आणि व्हॉल्यूमसाठी उपलब्ध असतील. हॉटस्पॉट जिओ फोन नेक्स्ट मध्ये देखील आढळू शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.