मुंबई – लॉकडाऊनच्या परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी एकमेकांची मदत करण्यासाठी एकजूट दाखवत आहेत. सोनू सूद, सलमान खान, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक कलाकार मंडळी आपापल्या परीने मदत कार्य करत आहेत.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सुद्धा असाच पुढाकार हाती घेतला आहे. गरजवंतांना जेवण पुरवण्या पासून तर मुंबई पोलिसांसाठी रेन कोट वाटप या प्रकारची सर्वच मदत सध्या जॅकलीन करताना दिसत आहे.
जॅकलिन फर्नांडिस इनिशिएटीव्ह ग्रुप आणि योलो फाऊंडेशनच्या वतीने पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते मुंबई पोलिसांसाठी 1000 रेन कोट वाटप करण्यात आले. तसेच आणखीन 15000 रेन कोट वाटप केले जाणार आहेत. काहीदिवसांपूर्वी जॅकलीनने “योलो फाउंडेशन’ची स्थापना केली होती.