जेटचा ‘स्लॉट’ आता अन्य कंपन्यांना

पुणे – जेट एअरवेजची उड्डाणे नुकतीच स्थगित करण्यात आली आहेत. जेटच्या उड्डाणांचा “स्लॉट’ दुसऱ्या कंपन्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या निर्णयामुळे विमानतळावरील सेवा पूर्ववत होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या जेट एअरवेज या कंपनीने दिवसेंदिवस उड्डाणांची संख्या कमी केली होती. यासह कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने त्यांनी संपदेखील केला होता. अखेरीस कोंडीमध्ये सापडलेल्या जेटने त्यांच्या सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.

लोहगाव विमानतळावर दैनंदिन सुमारे 200 उड्डाणे होत होती. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये याची संख्या जवळपास 150 उड्डाणांवर येऊन ठेपली होती. यामध्ये जेटची दैनंदिन 21 उड्डाणे होत होती. मात्र, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या चारवर आली. सध्या मात्र ही उड्डाणे पूर्णच स्थगित केल्याने, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाने हे जेट कंपनीचे “स्लॉट’ अन्य कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.