सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही एकामागोमाग एक लग्न करत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर 17 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हॉलिवूडमधील एका स्टार कपलनेही एंगेजमेंट केली आहे. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेझ आणि अभिनेता बेन ऍफ्लेक पुन्हा एकदा 20 वर्षानंतर एकत्र येणार आहेत.
जेनिफर अभिनेता बेन दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेनिफर लोपेझने तिच्या एंगेजमेंटची अंगठी दाखवत एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यांच्या एंगेजमेंटच्या बातमीची पुष्टी केली आहे. तिने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘हे जाहीर मला खूप आनंद होतो आहे…’ मात्र, दोघांची एंगेजमेंट नेमकी केव्हा झाली याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
जेनिफरचे याआधी तीन लग्न
याआधी 2002 मध्ये बेन आणि जेनिफर यांनी एंगेजमेंट केली होती. पण, ते दोन वर्षांनी दोघे वेगळे झाले होते. याआधी जेनिफरने तीन वेळा लग्न केले आहे. तिने 1997मध्ये ओझानी नोआशी लग्न केले, जे अवघ्या एका वर्षानंतर मोडले. यानंतर तिने 2001मध्ये क्रिस जडशी लग्न केले, जे दोन वर्षांनी मोडले. जेनिफरने 2004 मध्ये मार्क अँथनीसोबत तिसरे लग्न केले आणि तब्बल 10 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा एकदा बेन आणि जेनिफर यांनी एकत्र येत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.