जवळार्जुन – मुलगा व पत्नीची भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून वडिलांच्या डोक्यात कोयत्याने गंभीर वार केल्याची घटना जेजुरी येथील विद्या नगर परिसरात शुक्रवारी (दि. 19) रात्री घडली. याबाबत श्यामदास नामदेव ताकवले (वय 62, रा. विद्यानगर जेजुरी) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा लहान मुलगा रवी याला फिर्यादीच्या पत्नीने जेवण करायचे आहे का? असे विचारले असता रवी हा दारू पिलेला असल्याने मला जेवण नको. म्हणून फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करू लागला. मात्र फिर्यादी हे पत्नी अंजना हिस शिवीगाळ करू नको म्हणून असे म्हणाले, या कारणावरून रवी यांनी घरातील लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली व फिर्यादीचा मोठा मुलगा ही भांडणे सोडविण्यास गेले असता, त्याला रवी याने हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. तपास सासवड पोलीस करीत आहेत.