मुंबई – बॉलीवूड किंग शाहरुख खानने दक्षिणेतील चित्रपट निर्माता एटलीसोबत त्याचा नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अॅटली यांच्या ‘जवान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात शाहरुख खानचा लुक एकदम दमदार दिसून येत आहे.
जवानच्या टीझरमधला शाहरुख खानचा लूक पाहून तुमचेही होश उडातील. तरुण झालेला किंग खानच्या या लूकची चर्चा सध्या सोशलवर जोरदार आहे. किंग खानला या आधी सर्वानी रोमँटिक हिरोच्या भूमिकेत बघितल आहे. मात्र यावेळी तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
या लूकमध्ये शाहरूखचा संपूर्ण चेहरा, डोके आणि हातावर पट्टी बांधलेली आहे. हा टीझर पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की शाहरुख तरुण बनून बॉक्स ऑफिसवर थैमान घालणार आहे.
जवान हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट आहे हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचा पठाणही या वर्षी जानेवारीत येणार आहे. म्हणजे 2023 हे वर्ष किंग खानच्या नावावर असणार आहे. जवान हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
टीझर पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की जवान हा पॅन इंडियाचा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शक आणि नायिका दक्षिणेतील आहेत. जवानच्या टीझरमधील शाहरुखचा स्वॅग पाहून तुम्ही सुद्धा त्याचे फॅन व्हाल. या सिनेमात शाहरुखला साऊथच्या अॅक्शन सिनेमांसारखे टिपिकल सीन्स करताना पाहून तुम्ही वाह म्हणाल.