मुंबई – भारतात धुमाकूळ घातल्यानंतर राजामौली यांचा सिनेमा आर आर आर आता जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राजामौली,ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान एनटीआरचा आपल्या चाहत्यांसोबतचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये जपानी चाहते एनटीआरचे किती मोठे फॅन आहेत हे दिसून येतंय. एकंदरीतच या व्हिडीओमुळे साऊथ स्टार्स आणि साऊथ चित्रपट विदेशात देखील किती चर्चेत असतात याचा प्रत्येय येतोय. महत्वाची बाब म्हणजे एनटीआरचे चाहते यावेळी त्याच्यासाठी अक्षरशः रडताना दिसले आहेत. अनेकांनी यावेळी एनटीआरसोबत सेल्फीसह ऑटोग्राफ देखील घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
View this post on Instagram
जपान या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्शनपट बनत असल्यामुळे आर आर आरदेखील येथे सुपरहिट होईल अशी अपेक्षा दिग्दर्शकासह निर्मात्यांना आहे. जपानी चाहत्यांचे प्रेम पाहून अनेक नेटकऱ्यांनी एनटीआर हा रिअल हिरो असलयाचे म्हंटले आहे. तर अनेकांनी हे फक्त साऊथ स्टार्ससोबतच होऊ शकत असं म्हणत एनटीआरचे कौतुक केले आहे.