नवी दिल्ली : एकीकडे परतीच्या पावसाने देशातील अनेक राज्यात हैदोस घातला आहे. त्याचा परिणाम सर्वांवर होताना दिसून येत आहे. पावसामुळे सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्लेटलेट या रक्तघटकाची मागणीही वाढत आहे. प्लेटलेटसंदर्भातील एक खळबळजनक घटना उत्तप्रदेशमधून समोर आली आहे.
रुग्णाला प्लेटलेट्सच्या ऐवजी ‘मोसंबी’चा ज्यूस दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये प्रदीप कुमार पांडे यांना डेंगूची लागण झाली होती. डेंगूच्या उपचारासाठी पांडे यांना रुग्णालायात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना प्लेटलेट्सच्या जागी ‘मोसंबी’चा ज्यूस सलाईन मार्फत देण्यात आला. त्यानंतर पांडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची पोलिसांनी याची दखल घेत रुग्णालयाला टाळे ठोकले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस अधिकारी शैलेश कुमार पांडे यांनी याविषयी महतो दिली. त्यानुसार, खोटे प्लेटलेट्स विकणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळील प्लेटलेट्सचे अनेक पाउच जप्त करण्यात आले. हे लोक रक्त पेढीतून प्लाज्मा विकत घेत. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पाउचमध्ये टाकून विकत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अटकेत असलेले लोक रुग्णांना प्लेटलेट्सच्या नावाखाली ‘मोसंबी’चा ज्यूस देत होते का? प्लाज्मा हे अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. लवकरच सत्य समोर येईल, असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.