मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यामध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. इतकेच नाही तर जान्हवी तिच्या हॉट अवतार दाखवण्यातही मागे नाही.
View this post on Instagram
ती अनेकदा तिच्या सिझलिंग फोटोशूटचे फोटो शेअर करते आणि पुन्हा एकदा जान्हवीने असेच काही केले आहे. जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
जान्हवी कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती डीप नेक ऑरेंज कलरच्या शॉट ड्रेसमध्ये तिचा बोल्ड अंदाज दाखवत आहे. या सर्व फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देत आहे, ज्यामध्ये जान्हवीच्या एक्सप्रेशनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दुसरीकडे, जान्हवीच्या लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने केशरी रंगाच्या शॉट ड्रेससह हेअर पोनी बनवली आहे, ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोंसोबत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विटामिन सी या लेटर.’ जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर येताच चांगलेच व्हायरल होत आहेत. अवघ्या 45 मिनिटांत या फोटोंना 3 लाख 77 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय चाहते कमेंट करून जान्हवीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंवर अनेक चाहत्यांनी हृदय आणि आगीचे इमोजी पाठवले आहेत. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘बिनोद देख रहा है तेरी भाभी को’ म्हणत कॉंमेंट्स केली आहे. जान्हवी नुकतीच ‘गुडलक जेरी’ चित्रपटात दिसली. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती.
जान्हवीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याचवेळी, तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना, अभिनेत्री लवकरच ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. 2023 मध्ये ती वरुण धवनसोबत ‘बावल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.