मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर भाजप आक्रमक झाले आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपनेते प्रयत्नशील आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक भाजप नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यातच आता परब यांना नोटीस आली आहे.
अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाल की, शाब्बास ! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समजून घ्या, असं आवाहन करताना, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू असं म्हणत राऊत यांनी जय महाराष्ट्र म्हटलं.
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021
एकंदरीतच परब यांच्यावर पुढील काळात काय कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.