हरियाणातील ‘त्या’ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू; देशभरातून संताप

कर्नाल (हरियाणा) – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला होता. त्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. अनेकांची डोकी फुटल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली होती. यात एका शेतकऱ्यांना करुण अंत झाला.

सुशील काजल असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांच्या लाठी हल्ल्यात सुशील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांचं निधन झालं.

सुशील काजल हे मागील 9 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी असल्याची माहिती गुरनाम सिंग चारुणी यांनी ट्विट द्वारे दिली आहे. विशेष म्हणजे कर्नाल हा मतदारसंघ हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आहे. या घटनेचा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.