श्रीनगर: पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नजरकैदेत मुदतवाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती आणखी 3 महिने नजरकैदेत असतील. गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम ३७० रद्द केल्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांना ऑगस्ट २०१९ पासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अलीकडेच मेहबुबा मुफ्ती यांनी सुटकेसाठी कोर्टाकडे मागणी केली होती.
एकीकडे प्रशासनाने मेहबुबा मुफ्ती यांच्या अटकेत वाढ केली आहे, तर दुसरीकडे पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांना शुक्रवारी कोठडीतून मुक्त करण्यात आले आहे. खुद्द लोन यांनी ट्विट करून आपल्या सुटकेची माहिती दिली. अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले गेले होते.
५ ऑगस्ट २०१९ रोजी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० च्या तरतुदी रद्द केल्या. यावेळी सरकारने सर्व नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि इतर अनेक राजकारण्यांचा सहभाग होता. अलीकडेच अन्य नेत्यांनाही कोठडीतून मुक्त करण्यात आले होते, ज्यात फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता.
जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्याची अंमलबजावणी होण्यापूर्वी राज्यातील इतर प्रमुख नेत्यांसमवेत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनाही राज्य प्रशासनाने ५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले होते. जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री यांना प्रथम हरि निवास येथे ठेवण्यात होते. त्यानंतर त्यांना चश्मा शाही येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. पुढे नोव्हेंबर महिन्यात त्यांना लाल चौकपासून थोड्या अंतरावर ट्रान्सपोर्ट लेन येथे असलेल्या शासकीय अतिथीगृहात प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्यात होते. फेब्रुवारी महिन्यात राज्य प्रशासनाने त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत तुरूंगात टाकले.
हे सुद्धा वाचा…