जालना – जालन्यात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टील कारखाना,कापड व्यावसायिक रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्यावर धाडी टाकल्यानंतर आयकर विभागाला मोठं घबाड हाती लागल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये तब्बल ३९० कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे. ज्यात ५८ कोटींची रोख रक्कम,३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. तसेच ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रंही आयकर विभागाला सापडली आहेत.
आयकर विभागाने १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान हे धाडींचे मिशन सत्र पूर्ण केले आहे. कोणालाही माहिती न देता सर्व खबरदारी खेत आयकर विभागाने ही मोहीम फत्ते केल्याचे समजते. यावेळी सापडलेली रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला तब्बल १३ तासांचा कालावधी लागला तसेच यावेळी स्थानिक सरकारी बँकेची मदत देखील घेण्यात आल्याचे समजते.
Maharashtra | Income Tax conducted a raid at premises of a steel, cloth merchant & real estate developer in Jalna from 1-8 Aug. Around Rs 100 cr of benami property seized – incl Rs 56 cr cash, 32 kgs gold, pearls-diamonds & property papers. It took 13 hrs to count the seized cash pic.twitter.com/5r9MHRrNyR
— ANI (@ANI) August 11, 2022
अशी झाली कारवाई
१ ते ८ ऑगस्ट कारवाई
२६० अधिकारी कर्मचारी
५८ कोटी रोख. १६ कोटींचे सोन्याचे दागिने,
हिरे. ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता
१३ तास रोकड मोजली.
अधिकाऱ्यांनी घेतली खबरदारी
छापा टाकताना कोणालाही खबर लागू नये यासाठी आयकर विभागाने गोपनीयता बाळगली होती. तसेच अधिकाऱ्यांनी रेड टाकायला जाताना आपल्या गाड्यांवर लग्नाचे बॅनर लावल्याचे देखील समोर आले आहे.