आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई करत आहे; राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी) कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन केले.

केंद्र सरकारने केलेली ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तसेच केंद्र सरकार, पंतप्रध नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधीत कारखाने, त्यांच्या तीन बहिणी यांच्या घरी, कार्यालयावर काल सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावरही छापा टाकला. ही कारवाई अद्यापही सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.