नांदूर- सहजपूर ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधून जय मल्हार विकास पॅनलच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. जय मल्हार विकास पॅनलचे प्रमुख बापूसाहेब मेहेर म्हणाले की, जय मल्हार विकास पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक एकमधील जे उमेदवार विजय झाले. त्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो.
वॉर्ड 1 मध्ये अटीतटीची लढत झाली होती. याकडे गावचे लक्ष लागले होते. या वॉर्डमध्ये रायरेश्वर पॅनलचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. तर जय मल्हार विकास पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले. जय मल्हार विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सविता दत्तात्रय (बापूसाहेब) मेहेर, प्रियंका राजेंद्र मकर, सीताराम पोपट वेताळ.
यावेळी माजी सरपंच पोपटराव बोराटे, उद्योजक सतीश खुणे, माजी सरपंच सिद्धार्थ गजधने, सागर माकर, छबन माकर, भाऊ माकर, लीला माकर, राजू पांगारकर, संतोष गायकवाड, भाऊ कोकाटे, पोपट म्हेत्रे, महेश म्हेत्रे, पोपट विधाटे, कुमार म्हेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.