अक्षयसोबत पुन्हा एकदा काम करणार जगन शक्‍ती

बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षयकुमारने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यापैकी “मिशन मंगल’ हा एक हिट चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे जगन शक्‍तीने दिग्दर्शनात पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटाने सुमारे 200 कोटींची कमाई केली. आता पुन्हा एकदा जगन शक्‍ती आणि अक्षयकुमार सोबत काम करणार आहे. 

अक्षयकुमारच्या “मिशन लायन’ चित्रपटासाठी जगन शक्‍तीने होकार दर्शविला आहे. या चित्रपटासाठी त्याला चार कोटी रुपये फी देखील देण्यात येणार आहे. बेलबॉटम चित्रपटाचे प्रोड्यूसर वाशु आणि जॅकी भगनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 2021मध्ये सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात चित्रपटाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

या चित्रपटासाठी अक्षयकुमारलाही मोठी फी दिली जात असल्याची बातमी आहे. याशिवाय तो या चित्रपटाचा प्रोडक्‍शन पार्टनरही असणार आहे. दरम्यान, अक्षयकुमार बॉलीवूडमधील सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. 

आता तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे. 2020च्या सुरुवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. करोनापूर्वी त्यांचा “सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.