मुंबई – अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिने अतिशय कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. “चिट्टीयां कल्लाईयां वे…’ या गाण्यामुळे जॅकलिन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.
जॅकलिन सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते, ती सतत आपल्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
दरम्यान, नुकतंच जॅकलिनने दुबई ट्रिपचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोतील तिचा हॉट अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये जॅकलिन पूलमध्ये धमाल करताना दिसत असून, यावेळी तिने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
या बिकिनी लूकमध्ये जॅकलिन कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोमध्ये मागे दुबईची स्कायलाईन दिसत आहे. दुबई ट्रीपमध्ये धमाल करत असली तरी या सगळ्या गोंधळात ती आपल्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेत आहे.
जॅकलिन फर्नांडिसने बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तिने आपल्या हॉट फोटोशूटद्वारे अनेकांना घायाळ केलं आहे. आणि आता सुद्धा करत आहे.